नारायण राणे मोठ्या मताधिक्याने निवडून येणारच… विशाल परब

नारायण राणे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत. कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे मेहनत केल्यामुळे त्यांच्या मतांचा आलेख वाढता आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी दिली. राणे यांच्या मताधिक्यात वाढ होत असल्यामुळे श्री. परब यांनी याबाबतची प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत श्री. परब यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे. यात असे म्हटले आहे की, राणेंनी २५ हजारापेक्षा आघाडी घेतली असून उर्वरीत मोजणीत यापेक्षा जास्त मते घेवून आघाडी घेत ते जास्तीत-जास्त मताधिक्याने निवडून येतील. महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली याचे हे फळ आहे. त्यांचे आपण आभार व्यक्त करून खूप-खूप धन्यवाद देतो. या सर्वांना आपण भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून धन्यवाद देतो व ऋण व्यक्त करतो आणि नारायण राणे यांच्यावर प्रेम दाखवलेल्या कोकणातील जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो. मतदारांचे आपण हे ऋण कायम लक्षात ठेवून भाजपचे कार्यकर्ते यापुढेही जोमाने काम करतील. ही आघाडी बघून आपल्याला आनंद होत असल्याचेही परब यांनी यावेळी स्पष्ट केले आहे

error: Content is protected !!