सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदार संघात धाकधूक वाढली…

राणे व राऊतांमध्ये काटे की टक्कर
सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया अखेर सुरू झाली असून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या जोरदार टक्कर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मतदारसंघातील जनतेची धाकधूक वाढली आहे. दुसरीकडे खुद्द भाजप नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ४ हजार मतांनी पिछाडीवर तर काँग्रेस नेते राहुल गांधी आघाडीवर आहेत. ही आकडेवारी काही पहिल्या टप्प्यातील आहे. यानंतर चित्र पुन्हा बदलण्याची शक्यता आहे. बारामती मतदारसंघातून माजी खासदार सुप्रिया सुळे या आघाडीवर आहे. कोल्हापूर मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज आघाडीवर आहेत. ठाण्यातून नरेश म्हस्के हे आघाडीवर आहे. बीडमध्ये विद्यमान खासदार पंकजा मुंडे या पिछाडीवर आहेत. कल्याण येथे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे आघाडीवर आहेत.





