एस्. एल्. देसाई विद्यालय, पाटचा निकाल ९७.२९ टक्के

महती रवींद्र बुरुड प्रशालेतून प्रथम

प्रतिनिधी । कुडाळ : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च -२०२४ मध्ये प्रशालेतील १११ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी १०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा निकाल ९७.२९ टक्के लागला. प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक कु. बुरुड महती रविंद्र (४९०/५००) ९८.०० टक्के, द्वितीय क्रमांक कु. रावले जान्हवी प्रसाद (४८६/५००) ९७.२० टक्के, तृतीय क्रमांक कु. तळवडेकर प्रज्वल प्रशांत (४८२/५००) ९६.४० टक्के.
तसेच विद्यालयातील १५ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त झाले. यामध्ये ४५ विद्यार्थी विशेष प्राविण्याने, ४२ विद्यार्थी प्रथम श्रेणीने, १७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीने आणि ०४ विद्यार्थी तृतीय श्रेणीने उतीर्ण झाले. या घवघवीत यशाबद्दल संस्था, विद्यालय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक वर्गाचे दशक्रोशीत कौतुक होत आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!