कणकवली येथे उद्या होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या नियोजनाचा आ. वैभव नाईक यांनी घेतला आढावा
उद्याची सभा भव्य करण्याचा शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे इंडिया- महाविकास आघाडीचे उमेदवार खा. विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भव्य जाहीर प्रचार सभा उद्या शुक्रवार दि. ३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालया समोरील मैदानात (नरडवे फाटा नजीक) होणार आहे. या प्रचार सभेची जय्यत तयारी सुरू असून इंडिया-महाविकासचे आघाडीचे सर्व नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते, आणि जिल्हावासीयांनी उद्धवजी ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केले आहे. आज आ. वैभव नाईक यांनी सभा स्थळाची पाहणी केली व नियोजनाचा आढावा घेतला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, उपजिल्हाप्रमुख संदीप कदम,संकेत नाईक आदी उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी