वायंगणी, साळीस्ते येथे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचार सुरु

मतदारांकडून विनायक राऊत यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचे
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडी चे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी खारेपाटण विभागात सुरुवात झाली असून,यावेळी मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले.वा्यंगणी, साळीस्ते येथे घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन त्यांना मतदारांकडे मशाल निशाणी पोचवण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व आघाडीचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.जिल्हा प्रमुख -संदेश पारकर, उपतालुका प्रमुख-महेश कोळसुलकर माजी विभाग प्रमुख -दया कुडतरकर यांच्या नेतृत्वाखाली वा्यंगणी माजी सरपंच -निलेश कदम, दीपक पुजारी याच्यासह शिवसेने चे(उध्दव बाळासाहेब ठाकरे) सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचाराच्या रिंगणात उतरून लोकसभा निवडणुकीचे उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार करीत आहेत.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!