चिंचवली येथे महायुतीचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराला सुरुवात..

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराला चिंचवली मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराला चिंचवली येथे सुरुवात झाली असून भाजपा चिंचवली विभागाच्या वतीने खारेपाटण-चिंचवली विभागातील सर्व गावांमध्ये महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यात आले असून विभागातील सर्व गावांमध्ये घरोघरी प्रचार करण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून चिंचवली गावात सुद्धा नारायण राणे यांच्या प्रचाराला उत्साहात प्रचाराला सुरुवात झाली आहे ..भाजपा चे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन नारायण राणे यांचा प्रचार करत आहेत.
यावेळी भाजपचे अशोक पाटील-चिंचवली सरपंच, राजेंद्र पेडणेकर -उपसरपंच,सुनील भालेकर राजेंद्र भालेकर, चंद्रकांत,अनिल पेडणेकर -माजी सरपंच, गुरव सुरेश गुरव पेडणेकर जयवंत भालेकर प्रमिला पाटील अध्यक्ष रवींद्र गुरव दशरथ वाघरे,तुकाराम गुरव,अक्षता आंब्रे,महेश बांदिवडेकर,प्रमिला पाटील सागर भालेकर,संजय भालेकर,दीपक भालेकर,गुणाजी अमरे,विनायक सुतार, श्रीधर गव्हाणकर,पांडुरंग पेडणेकर,अंकुश भाईजे, राजा पेडणेकर व सर्व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!