घोडावत विद्यापीठात विमान दुरुस्ती विषयक राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन
जयसिंगपूर :संजय घोडावत विद्यापीठातील एरोस्पेस अभियांत्रिकी विभागाने एरोस्पेस विषयात रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळेचे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन स्टार एअर चे अभियंता फते बहादुर सिंग आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण पाटील यांनी केले.
हि कार्यशाळा 13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी पर्यंत चालणार असल्याची माहिती एरोस्पेस अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ.बालाजी यांनी दिली. या प्रशिक्षणाचा विषय ‘रिसेंट ट्रेंड्स अँड डेव्हलपमेंट्स इन एव्हिएशन मेंटेनन्स’ हा आहे. देशभरातून 200 विद्यार्थी आणि शिक्षक यामध्ये सहभागी झाले आहेत. त्यांना स्टार एअर बेंगलुरु येथील विमान देखभाल दुरुस्ती करणारे अभियंता प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षण कालावधीत प्रत्यक्ष विमान, हेलिकॉप्टर दुरुस्ती करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. प्रशिक्षणादरम्यान कोल्हापूर विमानतळाला भेट देऊन धावपट्टी आणि उड्डाण पूर्व विमान तपासणी कशा पद्धतीने केली जाते,याबाबत माहिती दिली जाणार आहे. विमान देखभाल दुरुस्ती संदर्भात सर्वतोपरी प्रशिक्षण देण्याचा उद्देश या कार्यशाळेचा आहे. या प्रसंगी शैक्षणिक विद्याशाखा सहयोगी अधिष्ठाता प्रा. संजयकुमार इंगळे, प्रा. सुलतान, प्रा. व्ही. बाबू, प्रा. हेमंत शिंदे, प्रा. निलेश सबनीस, प्रा. सावंतआणि विद्यार्थी उपस्थित होते.
चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलसचिव डॉ.विवेक कायंदे यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत.