‘राजू बन झंटलमन’ १४ फेब्रुवारीला कुडाळमध्ये

खूप धमाल विनोदी तितकेच रहस्यमयी नाटक

निष्ठावंत नोकर आणि प्रेमळ मालकाची जुगलबंदी

चला हवा येऊ द्या’ फेम उमेश जगताप आणि कॉमेडीचा सुपर हिरो अंशुमन विचारे आमनेसामने

ब्युरो न्युज | कुडाळ : चला हवा येऊ द्या फेम उमेश जगताप आणि कॉमेडीचा सुपर हिरो अंशुमन विचारे यांच्या तुफान कॉमेडीने नटलेल्या राजू बन गया झंटलमन या नाटकाचा प्रयोग येत्या १४ फेब्रुवारीला रात्री ९.३० वाजता कुडाळ मध्ये बाबा वर्दम रंगमंचावर सादर होणार आहे. या नाटकाची आगाऊ तिकीट विक्री १२ फेब्रुवारीपासून नेमळेकर स्नॅक्स कॉर्नर, कुडाळ हायस्कुल समोर इथं सुरु होणार आहे.
राजेश कोळंबकर लिखित आणि प्रशांत विचारे दिग्दर्शित राजू बन गया झेंटलमन हे खूप धमाल विनोदी तितकेच रहस्यमयी नाटक आहे. सौ. कल्पना विलास कोठारी सादर करणाऱ्या आणि रंगनिल निर्मित या नाटकात निष्ठावंत नोकर आणि प्रेमळ मालकाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. या नाटकात उमेश जगताप आणि अंशुमन विचारे यांच्या सह अमृता फडके, विनम्र भावलं, संदीप कांबळे, नरेंद्र केरकर यांच्या धमाल भूमिका पाहायला मिळणार आहेत.
राजू बन गया झेंटलमनची कथा मालक आणि नोकराच्या अवतीभवती फिरत असली तरी त्यात अंशुमन विचारे या नटाने साकारलेला नोकर हा बावर्जी सिनेमा मधला राजेश खन्ना आणि स्वर्ग मधला गोविंदा यांच्या तोडीचा वाटायला लागतो. अंशुमन विचारे इतके त्यात समरसून गेले आहेत. ‌ त्याच बरोबर उमेश जगताप यांनी साकारलेला मालक आयत्या घरात घरोबा या मराठी सिनेमातला अशोक सराफ यांनी साकारलेला गोपू काका आठवायला लावतो. अमृता फडके यांनी साकारलेली चिंगी पण तिच्या अल्लडपणा मुळे लक्षात राहते. त्याचबरोबर पालिका कर्मचारी, पोलिस आणि पाकिस्तानचा बजरंगी भाईजान ही छोट्या भूमिकेत असले तरी छाप पाडून जातात.ते नरेंद्र केरेकर, संदीप कांबळे. या नाटकात चिंगीचा मानलेला कट कारस्थानी भाऊ विनम्र भाबल यांनी चांगला साकारलाय.
मालक आणि राजूचे संवाद त्याच्यातील भाषेच्या विशेषता राजूचे कोकणी भाषेतले संवाद आणि त्याला शुध्द करणारे मालक यातून त्यांची जुगलबंदी चांगलीच रंगते. हे संवाद प्रेक्षकाना खूप अधिक हसायला लावतात. राजूची मालकाप्रती निष्ठा असूनही मालकाच्या अभिनय करण्याच्या हौसेवर त्याने कठोर प्रहार करुन त्यातूनही खूप छान विनोदनिर्मिती झाली आहे. ‌मालकाच्या एकटेपणामुळे राजूने घेतलेली काळजी आणि राजुला खूप काम पडते म्हणून सोबतीला कोणीतरी घेऊन ये असं सांगणारा मालक उमेश जगताप यांनी तितकाच प्रेमळ साकारलाय.‌ नाटकात मध्ये मध्ये अलेक्सानी वाजविलेली गाणी, राजू आणि चिंगीच्या प्रेम प्रसंगात दिलेले गाणं, नाटकाचे संगीत, रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्थ साऱ्यांना पैकीच्या पैकी गुण द्यावे लागतील.
नाटकाच्या पहिला भाग खुनाच्या कट कारस्थाने संपतो आणि दुसऱ्या भागात त्या खूनाच्या कटाचा शोध सुरु होतो. अंशुमन यांनी साकारलेला राजू आणि उमेश जगताप यांनी साकारलेला मालक, चिंगीचा अल्लड पणा, तिच्या कारस्थानी भावाचे उद्योग,धमाल पालिका कर्मचारी, पोलिस, जवान, आणि पाकिस्तानचा सलमान खान उर्फ बजरंगी भाईजान बघण्यासाठी राजेश कोळंबकर लिखित आणि प्रशांत विचारे दिग्दर्शित राजू बन गया झेंटलमन हे खूप धमाल विनोदी तितकेच रहस्यमयी नाटक पाहायलाच हवं. येत्या १४ बुधवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी रात्री ठीक ९.३० वाजता कुडाळच्या बाबा वर्दम रंगमंचावर पाहायला विसरू नका राजू बॅन गया झेंटलमन. या नक्तंची आगाऊ तिकीट विक्री नेमळेकर स्नॅक्स कॉर्नर, कुडाळ हायस्कुल समोर इथं १२ फेब्रुवारी पासून सुरु होत आहे. तिकीट दर रु. ४००, ३०० आणि २०० आहेत. त्या शिवाय फोन बुकिंग सुविधा उपलब्ध असून त्यासाठी संजय नेमळेकर यांच्याशी ८३८०९८९३६६ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!