कणकवली शहरातील महिला व मुलींना केरला स्टोरी 2 चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वतीने आयोजन

नगरसेविका मेघा गांगण यांचा पुढाकार

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली शहरातील महिला आणि मुली यांच्यासाठी केरला 2 या चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण करण्याचे ठरवले होते. त्यामुळे नगरसेविका मेघा गांगण यांनी पुढाकार घेऊन कणकवली शहरातील 200 महिला व मुली यांना आज लक्ष्मी चित्रमंदिर येथे केरला 2 हा चित्रपट दाखवला.
आजचे जग हे मोबाईलचे आहे आणि या मोबाईलच्या माध्यमातून कानाकोपऱ्यातील मुला मुलींचा एकमेकाशी संपर्क होऊ शकतो. त्या मुलांना एकमेकांबद्दल काही माहीत नसते. मुलींना वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून आपल्या जाळ्यात ओढलं जाते. त्यामुळे पुढे जाऊन मुलींवर फसवणुकीची वेळ येते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आपण पेपरमधून दररोज वाचत असतो. कधीतरी अशा घटना आपल्या बाबतीत घडू शकतात आणि म्हणूनच आपल्या जिल्ह्यातील महिला व मुली सुरक्षित राहावे या एकाच विचाराने पालकमंत्री नितेश राणे यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून घराघरांमध्ये सावधानतेचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
महिला वर्गाने देखील घटनांचे गांभीर्य ओळखत चित्रमंदिर मध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहर मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नगरसेविका प्रतिक्षा सावंत, आर्या राणे, लक्ष्मी चित्रमंदिरचे व्यवस्थापक राजू मल्हार इत्यादी उपस्थित होते.

error: Content is protected !!