उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते कुडाळ आणि मालवण मधील २५ दिव्यांग बांधवांना मोफत चारचाकी स्कुटरचे वाटप

दिव्यांग बांधवांना ७ वेळा चारचाकी स्कुटर वाटपाचा आ. वैभव नाईक यांचा विक्रम

आ. वैभव नाईक यांच्या सातत्यपूर्ण उपक्रमाचे उद्धवजी ठाकरे यांनी केले कौतुक

  शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे  यांच्या जनसंवाद दौऱ्यानिमित्त आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ व मालवण तालुक्यातील २५ दिव्यांग बांधवांना मोफत चारचाकी स्कुटरचे वाटप रविवारी उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामध्ये कुडाळ तालुक्यातील १६ आणि मालवण तालुक्यातील ९  दिव्यांग बांधवांना स्कुटर  वाटप करण्यात आल्या.  मोफत स्कुटर देण्यात आल्याने त्याचा आनंद दिव्यांग बांधवांना होताच आणि त्या स्कुटरचे वाटप उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते  झाल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता.  

     आमदार वैभव नाईक यांनी आपल्या दोन टर्मच्या आमदारकीच्या कारकिर्दीत ७ वेळा  दिव्यांग बांधवांना मोफत चारचाकी स्कुटरचे वाटप करून विक्रम केला आहे. सातत्याने दिव्यांग बांधवांना स्कुटर वाटप करणारे ते महाराष्ट्रातील पहिले आमदार ठरले आहेत. उद्धवजी ठाकरे यांनी देखील आ. वैभव नाईक यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. आ. वैभव नाईक यांनी हा उपक्रम राबवून दिव्यांग बांधवांना एक नवी भरारी घेण्याची संधी  दिली आहे. कुडाळ येथील दिव्यांग बांधवांना कुडाळ जिजामाता चौक येथील सभेवेळी तर मालवण मधील दिव्यांग बांधवांना बंदर जेटी येथील सभेवेळी स्कुटरचे वाटप करण्यात आले आहे.
error: Content is protected !!