“विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यासाठी कणकवलीत विज्ञान प्रयोग परीक्षा”

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी आणि प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञान अधिक प्रभावीपणे समजावे या उद्देशाने सावंत फौंडेशन, TIFR तसेच नेहरू सायन्स सेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान प्रयोग प्रात्यक्षिक व प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
सदर परीक्षा रविवार, १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी ३.०० या वेळेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली येथे होणार आहे.
या उपक्रमामध्ये इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील विविध प्रयोगांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार असून त्यानंतर विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
सध्या अनेक शाळांमध्ये प्रयोगशाळा व प्रयोग साहित्याच्या मर्यादेमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी मर्यादित मिळते. ही उणीव भरून काढण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांचा कल भविष्यात सायंटिस्ट, डॉक्टर व इंजिनियर अशा क्षेत्रांकडे वाढावा हा या कार्यक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या उपक्रमासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे. कणकवली परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थी व विज्ञान शिक्षक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
या संदर्भात अधिक माहितीसाठी शरद सावंत, उपाध्यक्ष सावंत फौंडेशन यांच्याशी संपर्क साधावा.
मोबाईल : 8275187062
ई-मेल : sawantfoundationorg@gmail.com
ही परीक्षा महिन्यातून एकदा घेण्यात येणार असून या साठी फक्त महिन्याला वीस विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे तरी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असणार आहे तरी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन
शरद सावंत यांनी केले आहे

error: Content is protected !!