श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा आयोजित होममिनिस्टर स्पर्धेत सौ. मधुरा परब पैठणीच्या मानकरी

श्री रामेश्वर वाचन मंदिर आचराच्या महिला दिनानिमित्त आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेत देसाई साडी सेंटर प्रायोजित पैठणीच्या मानकरी ठरल्या सौ. मधुरा महेश परब आचरा देऊळवाडी तर उप विजेत्या सौ. राधा गोविंद राणे आचरा देऊळवाडी यांना सौ. अनिता आनंद आचरेकर प्रायोजित सोन्याच्या नथीच्या मानकरी ठरल्या.
श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या संस्थेने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार आठ मार्च रोजी संस्थेच्या सभासद सौभाग्यवतींसाठी होममिनिस्टर स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचा शुभारंभ नुतन जिल्हा परिषद सदस्य सौ वर्षा सांबारी यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, त्रिंबक वाचनालयाचे सुरेंद्र सकपाळ, रामेश्वर वाचनालयाच्या उर्मिला सांबारी, श्रीमती. वैशाली सांबारी, भिकाजी कदम,, ग्रंथपाल विनिता कांबळी, सौ. वैशाली देसाई, सौ. अनिता आचरेकर, भावना मुणगेकर यांसह सर्व देणगीदार आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या सुरुवातीला मुंबई विद्यापीठात द्वितीय क्रमांक मिळविलेल्या आचरा कालेजच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर करत उपस्थितांची मने जिंकली. होममिनिस्टर स्पर्धा ५ फेऱ्यांमध्ये घेण्यात आली पहिल्या फेरीपासूनच आकर्षक बक्षिसे देण्यात आली.. या स्पर्धेसाठी सौ. उर्मिला सांबारी (आचरा), सौ. स्मिता परब (आचरा), श्रीम. वैशाली सांबारी (आचरा), श्रीम. शोभा सुखटणकर (आचरा), सौ. सीमा घुटुकडे (आचरा), सौ. सुमित्रा गुरव (आचरा), सौ. गीता खेडेकर (आचरा), सौ. अस्मिता गवस (सावंतवाडी), सौ. अंजली बापर्डेकर (आचरा), सौ. रक्षिता शानभाग (इंग्लंड), सौ. प्रणया टेमकर – मोरे (मुंबई, आचरा) यांनी प्रायोजित केली होती. उपविजेत्या होममिनिस्टरला सौ. अनिता आनंद आचरेकर (आचरा) यांजकडून सोन्याची नथ तर विजेत्या होममिनिस्टरला सौ. वैशाली देसाई (देसाई साडी सेंटर, आचरा) यांजकडून पैठणी देण्यात आली. उपस्थित प्रेक्षक वर्गासाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. अचूक उत्तर देणाऱ्या प्रेक्षकांसाठी सौ. मानसी राणे (आचरा) यांजकडून तर उपस्थित विद्यार्थी वर्गासाठीही प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. त्यातील १० विद्यार्थ्यांना सौ. प्रज्ञा पेडणेकर (आचरा) यांजकडून आकर्षक भेटवस्तू दिल्या गेल्या. तर सर्व सहभागी ३२ स्पर्धकांना श्रीम. नेहा घाडी (आचरा), सौ. सई राणे (कुलसूम नर्सरी, आचरा), सौ. स्वाती (आचरा), सौ. सानिका दुखंडे (आचरा) सौ. श्रुती सावंत (ग्रा. पं. सदस्या, आचरे), सौ. किशोरी आचरेकर (ग्रा. पं. सदस्या, आचरे) यांजकडून आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. नवनिर्वाचित जि. प. सदस्या सौ. वर्षा सांबारी, आचरा यांजकडून सर्व स्पर्धकांना व उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला. स्पर्धा यशस्वितेसाठी वाचन मंदिरचे महेश बापर्डेकर, समृद्धी मेस्त्री, स्वप्नील चव्हाण, सांस्कृतिक समिती सदस्या भावना मुणगेकर, कामिनी ढेकणे, श्रद्धा महाजनी, यांनी विशेष परिश्रम घेतले.





