श्री चेस अकॅडमी कणकवली आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत आयडियल चा स्वानंद आमडोसकर ठरला तृतीय क्रमांकाचा विजेता

कणकवली/मयूर ठाकूर
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कणकवली येथील श्री चेस अकॅडमी आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज वरवडे च्या स्वानंद विशाल आमडोसकर या विद्यार्थ्याने इयत्ता पहिली ते चौथी या गटामधून तिसरा क्रमांक पटकावला आहे साधारणतः या स्पर्धेत जिल्ह्यातून पहिली ते चौथी या गटांमध्ये 25 ते 30 स्पर्धक सहभागी झाले होते आपल्या उत्कृष्ट बुद्धिबळ कौशल्याच्या आणि बुद्धिबळातील चालींच्या जोरावर स्वानंदने हे यश प्राप्त केले आहे निश्चितच या यशामुळे स्वानंदने आयडियल चे नाव उज्वल केले आहे
या यशाबद्दल स्वानंदचे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल,संस्थापक सचिव प्रा. हरिभाऊ भिसे सहसचिव प्रा. निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ. शीतल सावंत मॅडम सल्लागार श्री. डी. पी. तानावडे सर मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक वर्गामध्ये अभिनंदन केले जात आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.





