रोटरी क्लब मालवण तर्फे बुरुड काम करणाऱ्या, मातीची भांडी बनवणाऱ्या, फुलांचे हार करून विकणाऱ्या महिलांचा सन्मान

महिला दिनाचे औचित्य साधत रोटरी क्लब मालवण तर्फे कट्टा, गुरामवाड, नांदोस येथील टोपल्या विणणाऱ्या, माती काम करणाऱ्या तसेच फुलांचे हार करून विकणाऱ्या आठ महिलांचा सन्मान करण्यात आला. या सर्व महिला कर्तुत्ववान असुन प्रपंच चालवतात.
कट्टा येथे नाथ पै सेवांगण सभागृहात हा कौतुक सोहळा पार पडला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघुन जे काही समाधान मिळालं ते अवर्णनीय होते. रोटरी मार्फत विविध समाज उपयोगी कार्यक्रम नेहमीच राबविले जातात.
रुपाली परुळेकर, राजश्री कुडाळकर, स्मिता गोठणकर, संगीता माने, वत्सला माने, सुरेखा तांबट, मंगल माने, वैशाली माने यांचा सन्मान करण्यात आला. वैशाली माने आणि रुपाली परुळेकर यांनी रोटरीने दखल घेऊन सन्मान केल्याबद्दल आभार मानले तसेच प्रथमच अशा प्रकारे सन्मान झाल्याबद्दल आनंदही व्यक्त केला.
यावेळी क्लबचे अध्यक्ष रो पंकज पेडणेकर, सेक्रेटरी रंजन तांबे, रो डॉ. लिना लिमये, रो सुविधा तिनाईकर, रो प्रविणा शिंदे, रो रमाकांत वाक्कर, सर्व नियोजन करणारे रो ऋषी पेनकर, शिवानी गाड उपस्थित होते.

error: Content is protected !!