गहाळ व चोरीस झालेले २० मोबाईल पोलीस अंमलदार प्रशांत कासले यांनी केले हस्तगत
जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी प्रशस्तीपत्र देऊन केला गौरव
गहाळ व चोरीस गेलेले मोबाईल शोधुन देण्याची अव्वल दर्जाची कामगिरी कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार प्रशांत प्रभाकर कासले यांनी सीईआयआर
पोर्टल द्वारे केली. एकूण २० मोबाईल जे गाहाळ झाले होते त्याचा शोध लावून हस्तगत करून फिर्यादींना परत केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस विभागातील प्रशांत कासले यांची ही कामगिरी उत्कृष्ट आणि अवल दर्जाची ठरलेली आहे. याची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी प्रशांत कासले यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला आहे.यावेळी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर व पोलीस अधिकारी उपस्थित होते.
प्रशांत कासले यांचे सर्वच स्थारतून अभिनंदन होत असून कणकवली पोसिल निरीक्षक मारुती जगताप,यांनी सुद्धा त्यांचे अभिनंदन केले आहे.प्रशांत कासले यांनी बिहार,मध्यप्रदेश,मुंबई,कोल्हापूर,कागल, देवगड,कुडाळ,कणकवली अश्या विविध ठिकाणा वरून मोबाईल हस्तगत करण्यास यश मिळविले आहे.त्यासाठी त्यांना कणकवली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांचे मार्गदर्शन लाभले होते.
कणकवली प्रतिनिधी