सिंधुदुर्ग कलाकार मानधन समिती सदस्यपदी मारुती सावंत यांची निवड
गेली अनेक वर्ष मारुती सावंत आहेत लोककलेमध्ये कार्यरत
गुरुकृपा दशावतार नाट्य मंडळ हळवल कंपनीचे मालक श्री मारुती अनंत सावंत यांची निवड कलाकार मानधन समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.या समितीवर निवड झाल्याने मारुती सावंत यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
हळवल गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असलेले मारुती सावंत हे सामाजिक वनीकरण विभागातून सेवानिवृत्त झाले आहे. दशावतार लोककलेची आवड असल्याने त्यांनी गुरुकृपा दशावतार नाट्य मंडळाची स्थापना केली असून या मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध भागात दशावतारी नाट्यप्रयोग ते सादर करतात. त्याचबरोबर अनेक कलाकारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांची सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समितीवर निवड झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
कणकवली प्रतिनिधी