विवाहितेच्या विनयभंग प्रकरणी आरोपी संकेत चौगुलेला जामिन मंजूर

आरोपी तर्फे ॲड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद

फोंडाघाट येथील एक विवाहीत महिला तिच्या मुलांना शाळेत सोडून रस्त्याने एकटीच घरी चालत जात असताना आरोपीने तिला अडवून तिच्या मनाला लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्याबाबत फिर्यादीने 9 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या तक्रारीवरून कणकवली पोलिस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७४, ७५, ७९, १२६, ११५(२), ३५१(२) नुसार गुन्हा दाखल करून आरोपी संकेत चौगुले (फोंडाघाट, बावीचे भाटले) याला अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. जामीन अर्जावर युक्तिवाद झाल्यानंतर संशयित आरोपीस १५ हजारांचा सशर्त जामिन मंजूर करताना सिंधुदुर्ग ओरोस येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. देशपांडे यांनी आरोपीने फिर्यादी अथवा साक्षीदारावर दबाव आणू नये, त्याना धमकावू नये, सरकारी पक्षाच्या पुराव्यात ढवळाढवळ करू नये, प्रत्येक मंगळवारी पोलिस स्टेशनला हजेरी लावावी, तपासकामात सहकार्य करावे, कोर्टाचे परवानगीशिवाय परदेशात जाऊ नये आदी अटी घातल्या आहेत. संशयित आरोपीच्या वतीने ॲड. अक्षय चिंदरकर यांनी युक्तिवाद केला.

कणकवली/ प्रतिनिधी

error: Content is protected !!