कोळपे जि.प.मतदार संघातील शेकडो ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड

कोळपे जिल्हा परिषद मतदार संघातील हेत गावातील ठाकरे शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश करून सामील झाले. या कार्यकर्त्यांनी आज कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तसेच पालकमंत्री ना. नितेश राणे यांची भेट देऊन त्यांच्या कार्य शैलीवर समाधान व्यक्त करत पक्ष प्रवेश केला. या कार्यकर्त्यांमध्ये ठाकरे सेनेचे भुईबावडा पंचायत समिती मतदार संघाचे निरीक्षक श्रीधर फोंडके, शाखा प्रमुख प्रभाकर राठोड आणि हेत ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश फोंडके यांचा यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.
तसेच गणेश फोंडके,राजेश फोंडके,शिवाजी डांगे, रविंद्रनाथ फोंडके,यशवंत फोंडके, नाना फोंडके, मारुती गुरव, सचिन गुरव, यश गुरव, सौरभ फोंडके, चंद्रकांत फोंडके, गावच्या माजी सरपंच व विद्यमान सदस्य प्रतीक्षा फोंडके, सत्यवान फोंडके, प्रमिला फोंडके,डांगे, बाबू फोंडके, दीपक फोंडके व अनेक कार्यकर्ते यांनी प्रवेश केला आहे.

या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, त्या विभागातील प्रमुख भाजपा पदाधिकारी कदम यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!