राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचा वाढदिवस माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडून साजरा

समीर नलावडे मित्र मंडळाने दिल्या अबिद नाईक यांना शुभेच्छा

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक अबिद नाईक यांचा वाढदिवस आज कणकवली चे माजी नगराध्यक्ष व अबिद नाईक यांचे जवळचे मित्र समीर नलावडे यांनी साजरा केला. कणकवली शहरात समीर नलावडे व अबिद नाईक यांची मैत्री सर्वश्रुत आहे. अबिद नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज कणकवली शहरातील पटवर्धन चौकामध्ये असलेल्या राजू गवाणकर यांच्या कार्यालयामध्ये हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कणकवली चे माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक बंडू गांगण, अण्णा कोदे, भाजपाचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, राजू गवाणकर आदी उपस्थित होते.

कणकवली /प्रतिनिधी

error: Content is protected !!