भ्रष्टाचाराला बळी पडू नका – विजय पांचाळ

लाचलुचपत प्रतिबंधक सप्ताहाला सुरुवात

”लाच देणे व लाच घेणे” दंडनीय अपराध आहे. भ्रष्टाचाराला बळी पडू नका, भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी पुढे या, अँटीकरप्शन ब्युरो सदैव तुमच्या सोबत आहे, अशी ग्वाही लाच लुचपत विभाग सिंधुदुर्गचे पोलीस उप अधीक्षक विजय पांचाळ यांनी दिली.
आज पासून म्हणजेच २७ ऑक्टोबर २०२५ पासून दि. २ नोव्हेंबर २०२५ या मुदतीत भ्रष्टाचाराच्या निर्मूलनासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कटिबद्ध आहे. कोणीही लोकसेवक/ सरकारी अधिकारी/ कर्मचारी जनतेच्या शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असेल तर टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा कुडाळ कार्यालयाच्या ०२३६२-२२२२८९ या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन विजय पांचाळ यांनी केले आहे.

error: Content is protected !!