डॉ. प्रमोद वालावलकर स्मृती प्रित्यर्थ ९ नोव्हेंबरला कुडाळात चित्रकला स्पर्धा

आरोग्य क्षेत्रातील जनसामान्यांचे देवदुत डाॅ. प्रमोदजी वालावलकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ येत्या दि. ९ नोव्हेंबर रोजी कुडाळ तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हि स्पर्धा कुडाळ येथील श्री देवी केळबाई मंदिरात सकाळी १० ते दुपारी १२ यावेळेत होणार आहे.
एकूण चार गटात हि स्पर्धा होणार आहे. त्यानुसार विषय ठरविण्यात आले आहेत. गट क्र. १ (पहिली व दुसरी) विषय- १) फुलपाखरू व फुल, २) विदुषक. गट क्र. २ (तिसरी व चौथी) विषय – १) माझं स्वच्छ घर व अंगण, २)माझा आवडता प्राणी. गट- क्र. ३ (पाचवी ते सातवी ) विषय – १) माझा आवडता मैदानी खेळ, २) स्वच्छ भारत अभियान, ३) वसुंधरा आणि विज्ञान. गट क्र. ४ (आठवी ते दहावी ) विषय – १) कोकणची संस्कृती, २) छ. शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग, ३) सोशल मीडिया फायदे व तोटे किंवा ग्लोबल वार्मिंग आदी विषय विषय आहेत.
प्रत्येक स्पर्धकाला ड्रॉईंग पेपर आयोजकांकडून पुरविवण्यात येईल. रंगाचे माध्यम वॉटर कलर, पोस्टर कलर, एक्रेलिक कलर, क्रेयॉन्स कलर, पेन्सिल कलर असे आहे. चित्रासाठी लागणारे सर्व साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणायचे आहे.
या स्पर्धेतील गट क्र. १ व गट क्र. २ साठी प्रथम क्रमांक रु. १ हजार, द्वितीय रु. ७००, तृतीय रु. ५००, गट क्र. ३ साठी प्रथम रु. १ हजार ५००, द्वितीय – रु. १ हजार, तृतीय रु. ७००. गट क्र. ४ साठी प्रथम क्रमांक रु. २ हजार, द्वितीय रु. १ हजार ५००, तृतीय रु. १ हजार अशी पारितोषिके आहेत. तसेच स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ७ नोव्हेंबर पर्यंत पद्माकर वालावलकर (मोबा.94035 58856 किंवा केदार टेमकर मोबा. 9422554088) यांच्याकडे नावनोंदणी करावी. या स्पर्धेत प्रवेश विनामूल्य आहे. अधिक माहितीसाठी नागेश नाईक (मोबा.9011410439) यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!