खारेपाटण हायस्कूल राज्यात प्रथम

राज्यस्तरीय कलाउत्सव स्पर्धेमध्ये खारेपाटण हायस्कूलचे नेत्रदीपक यश… राष्ट्रीय स्तरावर निवड…
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ( एससीईआरटी )महाराष्ट्र, पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कलाउत्सव २०२५ या स्पर्धेमध्ये शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटण या विद्यालयातील विद्यार्थ्यांचा समुह वाद्य वादन या कला प्रकारात राज्यामध्ये प्रथम क्रमांक आला आहे. राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करून प्रशालेच्या संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी खारेपाटण हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे..
संपूर्ण राज्यभरातून आलेल्या व आपापल्या विभागामध्ये सर्वोत्तम ठरलेल्या स्पर्धकांमध्ये पुणे येथे ही स्पर्धा संपन्न झाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून राज्यस्तरावर निवड झालेली शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटण ही एकमेव शाळा होती.
समूह वाद्यवादन या कला प्रकारामध्ये कु. आर्या अनिल मोसमकर, कु. आयुष प्रशांत मांगले, कु. वंश मारुती कानडे, कु. सुमित रविंद्र ठोसर या विद्यार्थ्यांनी लोकसंगीत वाद्यमेळ वादन सादर करून परीक्षकांची व पुणे येथील चोखंदळ रसिकांची वाहवा मिळविली.
या कला प्रकारासाठी श्रीधर पाचंगे व प्रशालेचे माजी विद्यार्थी मयूर जाधव, अक्षय कांबळे, प्रा.सौ.काझी मॅडम यांचे विशेष सहकार्य मिळाले...
प्रथम क्रमांक विजेत्या या सर्व विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या कलाउत्सव स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
या सर्व स्पर्धकांना प्रशालेचे संगीत शिक्षक संगीत अलंकार श्री. संदीप पेंडूरकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
स्पर्धा काळात शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार, सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, सामाजिक शास्त्र, कला व क्रीडा विभाग उपसंचालक डॉ. अरुण जाधव, मान. पद्मजा लांबरुड मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे, सर्व संचालक मंडळ, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे, डाएट कॉलेज चे प्रा.श्री.बाबुराव कांबळे, मुख्याध्यापक श्री.संजय सानप, पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन करण्यात आले व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.





