कणकवली शहरात भरलेला दिवाळी बाजार हा ग्राहकांसाठी पर्वणीच !

समीर नलावडे मित्र मंडळ व शहर भाजपच्या वतीने आयोजित दिवाळी बाजाराचा शुभारंभ
ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजस रेगे यांच्याकडून दिवाळी बाजाराच्या आयोजनाचे कौतुक
कणकवली शहर भाजप व समीर नलावडे मित्र मंडळ यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी बाजार चा शुभारंभ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजस रेगे यांच्या हस्ते करण्यात आला. गेली अनेक वर्ष हा दिवाळी बाजार समीर नलावडे मित्र मंडळ व शहर भाजप यांच्याकडून भरवला जातो. यावर्षी या दिवाळी बाजारामध्ये घरगुती बनवलेल्या वस्तू, फराळ यासह कुंभार बांधवांनी बनवलेली मातीची भांडी अनेक प्रकारचे आकाश कंदील, दिवाळीसाठी च्या पणत्या यासह अनेक वस्तूंचे दालन या निमित्ताने कणकवली वासीयांना उपलब्ध झाले आहे. स्थानिक व्यावसायिकांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून भरवला जाणारा हा दिवाळी बाजार म्हणजे खऱ्या अर्थाने या व्यवसायिकांना तसेच दिवाळीत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिवाळी ची भेटच म्हणावी लागेल असे उद्गार सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजस रेगे यांनी काढले. या बाजाराच्या शुभारंभ प्रसंगी कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, किशोर राणे, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अर्जुन राणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील नाडकर्णी, माजी नगरसेवक विराज भोसले, मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, संजय कामतेकर, चारुदत्त साटम, संजीवनी पवार, प्रद्युम मुंज, परेश परब, मनोहर पालयेकर यांच्यासह अन्य उपस्थित होते. या दिवाळी बाजारामध्ये तब्बल 35 हून अधिक स्टॉल लावण्यात आले असून, कणकवली शहरातील पेट्रोल पंपा समोर फ्लाय ओव्हर ब्रिज खाली हा दिवाळी बाजार सुरू करण्यात आला आहे. या दिवाळी बाजाराचा लाभ घ्या असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली





