विजेच्या लपंडावाने संतप्त आचरा वासियांची विजवितरणवर धडक सहाय्यक अभियंताना धरले धारेवर

ऐन भाऊबीजेलाच गुल झालेल्या विजेचा लपंडाव संपतासंपत नसल्याने संतप्त आचरा वासिय आणि व्यापारी वर्गाने शनिवारी सकाळी आचरा सबस्टेशन वीज वितरण कार्यालयावर धडक देत उपस्थित सहाय्यक वीज अभियंता सौरभ वर्मा यांना धारेवर धरले. यावेळी सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी विद्यूत मंडळाने कारभार न सुधारल्यास कार्यालयास टाळे ठोकण्यास मागेपुढे बघणार नाही पोलीसांनी गुन्हे दाखल केले तरी चालतील असा इशारा दिला.यावेळी गुरुवारी ३०आक्टोबर रोजी समस्या निवारण्यासाठी वीज वितरण च्या वरीष्ठ अधिका-यांना आचरा बाजारपेठ येथील कार्यालयात पाचारण करून बैठक आयोजित करण्याचे ठरविण्यात आले.
ऐन दिवाळीच्या सणात वीजेचा लपंडाव सुरू झाल्यामुळे ग्रामस्थ व्यापारी यांना मनस्ताप सहन करावा लागला होता.मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे मंदिचा फटका बसलेल्या व्यापारी वर्गाला ऐन दिवाळी सणातच सुरू झालेल्या लाईटच्या लपंडावामुळे मोठा फटका सहन करावा लागला.हाॅटेल , इलेक्ट्रॉनिक्स, ऑनलाईन कामकरणारे यांंना मोठे नुकसान सहन करावे लागले.मध्येमध्ये ये जा करणारी लाईट शुक्रवार रात्री पासूनच गायब झाली होती.शनिवारी सकाळी पण लाईट न आल्याने संतप्त व्यापारी, ग्रामस्थ यांनी सरपंच जेराॅन फर्नांडिस यांच्या समवेत आचरा टेंबली येथील विजवितरण कार्यालयावर धडक दिली.यावेळी सरपंच जेराॅन फर्नांडिस यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे,आचरा उपसरपंच संतोष मिराशी, व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष परेश सावंत, जयप्रकाश परुळेकर, अभिजित सावंत,अभय भोसले, डॉ प्रमोद कोळंबकर,ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, पंकज आचरेकर, महेंद्र घाडीं यांसह सिद्धार्थ कोळगे,विजय कदम,बाबू धुरी, विकास कावले,खोत, सचिन सारंग गोसावी यांसह अन्य ग्रामस्थ आदी उपस्थित होते. आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास टेंबूलकर, मिनाक्षी देसाई,मनोज पुजारे आदी आंदोलन स्थळीउपस्थित झाले होते.यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी विद्यूत मंडळाचे सौरभ वर्मा यांना धारेवर धरत व्यापारी वर्गाचे झालेले नुकसान तुम्ही भरुन देणार का असा प्रश्न विचारत लाईट बीलच भरणार नसल्याचा इशारा दिला. सबस्टेशनला सप्लाय करणा-या तळेबाजार,मालवण,विरण येथून येणाऱ्या वीज वाहिन्यांमध्ये एकाच वेळी कसा बिघाड झाला.वीज ग्राहकांचे नुकसान भरून कसे देणार असे प्रश्न विचारत सहाय्यक अभियंत्यांना धारेवर धरले.सरपंच जेराॅन फर्नांडिस, महेश राणे, अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर,परेश सावंत,अभिजित सावंत, संतोष मिराशी यांनी वीज अभियंता यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरले.यावेळी गुरुवार ३० आक्टोबर रोजी आचरे गावच्या वीज समस्या दुर करण्यासाठी वरीष्ठ अधिकारी यांना आचरा येथे बोलावून ग्रामस्थांसोबत बैठक घेण्याचे ठरविले.विद्यूत मंडळाच्या वरीष्ठ अधिकारी यांना बोलवण्याची जबाबदारी सहाय्यक अभियंता यांच्या वर सोपविण्यात आली.

error: Content is protected !!