आचरा कोळंब,मालवण मंडळातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी वेधले पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष

मालवण तालुक्यातील स्वयंचलित हवामान केंद्र समुद्रापासून जवळ असल्यामुळे आचरा कोळंब मालवण या ग्रामीण मंडळातील हवामान बदल या केंद्रात नोंदले जात नसल्यामुळे संबंधित मंडळातील शेतकरी पिक विम्यापासून गेली दोन वर्ष वंचित राहत असल्याबाबत भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधलं आहे.

या निवेदनात त्यांनी मालवण तालुक्यातील स्वयंचलित हवामान केंद्र समुद्रापासून जवळ असल्यामुळे आचरा कोळंब व मालवण तालुक्यातील या ग्रामीण मंडळातील हवामान बदल या केंद्रात नोंदले जात नाहीत.त्यामुळे संबंधित मंडळातील शेतकरी पिक विम्यापासून गेली दोन वर्ष वंचित राहत आहेत. तरी सदरील स्वयंचलित हवामान केंद्र बदलून ग्रामीण स्तरावर स्तरावर नेण्याची मागणी चिंदरकर यांनी या निवेदनाद्वारे केली आहे . सन 22 /23 मध्ये महावेद प्रकल्प अंतर्गत वेंगुर्ला तहसील कार्यालयासमोरील असलेले स्वयंचलित हवामान केंद्र बदलून कुशेवाडा येथे नेण्यात आले होते .तरी याच धर्तीवर मालवण तालुक्यातील स्वयंचलित हवामान केंद्र बदलून ग्रामीण स्तरावर नेण्यात यावे जेणेकरून ग्रामीण स्तरावरील सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळू शकेल असे म्हटले आहे.
यावेळी त्यांच्यासोबत महेश मांजरेकर राजू परुळेकर यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!