हुमरमळा (वालावल) ग्रामपंचायत सरपंचपदी अमृत देसाई
उपसरपंचपदी सौ रश्मी रमाकांत वालावलकर यांची निवड
अतुल बंगे आणि सौ अर्चना बंगे यांनी बालेकिल्ला अबाधित राखला – अमरसेन सावंत
प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील हुमरमळा (वालावल) ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अमृत देसाई यांची तर उपसरपंचपदी सौ. रश्मी रमाकांत वालावलकर यांची निवड झाली. या निवडीमुळे अतुल बंगे आणि सौ अर्चना बंगे यांनी बालेकिल्ला अबाधित राखला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी दिली. त्याच बरोबर हुमरमळा-वालावल गावातील लोकांच्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी कायमच काम करणार असल्याची ग्वाही अतुल बंगे यांनी यावेळी दिली.
कुडाळ तालुक्यातील हुमरमळा (वालावल) ग्रामपंचायत गेली कित्येक वर्षे अतुल बंगे यांच्या नेतृत्वाखाली खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना विकासनिधी मोठ्या प्रमाणात येत असताना २०२३ च्या निवडणुकीत अतुल बंगे यांना शह देण्यासाठी भाजपची जिल्ह्यातील मंडळी ठाण मांडून होती. वारेमाप आश्वासने देऊन सुध्दा हुमरमळा गावातील नागरिकांनी अतुल बंगे आणि अर्चना बंगे यांच्या वरचा विश्वास ढळु दिला नाही. त्याचाफलीत आज पहायला मिळाले,असाच सूर आजच्या सरपंचपदाच्या निवडीवेळी होता.
सरपंच श्री अमृत देसाई, उपसरपंच सौ रश्मी रमाकांत वालावलकर यांची निवड झाली तर युवासेनेचे धडाडीचे आणि आमदार वैभव नाईक यांचे खंदे समर्थक मितेश वालावलकर हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. सौ हेमांगी हेमंत कद्रेकर,सौ संजना संतोष गुंजकर ह्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येऊन पुन्हा एकदा गड काबीज करताच फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी सरपंच व उपसरपंच व सदस्य यांचा सन्मान उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे यांनी केला. यावेळी शिवसेनेचे अतुल बंगे,सौ अर्चना बंगे, निखिल वालावलकर,भाऊ गुंजकर, सुर्यकांत कांबळी,शरद वालावलकर, प्रकाश परब, हेमंत कंद्रेकर, उमेश कानडे, वैभव मांजरेकर,मानसी वालावलकर,सौ रमा गाळवणकर,श्रीम नम्रता परब,अपुर्वा वालावलकर, प्रदीप राणे,नारायण राणे, रमाकांत वालावलकर,आपा आकलेकर, मेघनाथ वालावलकर,पपु दळवी,कांता माड्ये, नरेंद्र पेडणेकर, राहुल बंगे आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.