कणकवली मतदारसंघातील उपसरपंच निवडीत आमदार नितेश राणे यांचा करिष्मा कायम

11 पैकी 9 ग्रामपंचायतींवर भाजपाचे उपसरपंच

ठाकरे गट, शिंदे गटाला प्रत्येकी एका उपसरपंच पद

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकी नंतर उपसरपंच पदासाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या निवडणुकीत कणकवली मतदारसंघातील 11 पैकी तब्बल 9 ग्रामपंचायतीवर भाजपा प्रणित उपसरपंच विराजमान झाले. तर शिवसेना पक्षाकडे 1 व उद्धव ठाकरे गटाकडे 1 उपसरपंच पद गेले. या निवडणुकीत देखील आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वा खाली भाजपाचे उपसरपंच बसल्याने कणकवली मतदारसंघात आमदार नितेश राणेंचा दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला. कणकवली तालुक्यामधील बेळणे खुर्द व ओटव या दोन्ही ग्रामपंचायतीचे उपसरपंच पदी भाजपाचे उपसरपंच निर्वाचित झाले. तर देवगड तालुक्यात तिर्लोट, ठाकूरवाडी, फणसगाव, पावनाई, विठ्ठलादेवी, शिरवली, वानिवडे या ग्रामपंचायतींवर देखील भाजपाचे उपसरपंच विराजमान झाले आहेत. तर केवळ रामेश्वर ग्रामपंचायत उपसरपंचपदी ठाकरे गट उपसरपंच तर वळीवडे ग्रामपंचायत उपसरपंच पदी शिवसेना शिंदे गट उपसरपंच विराजमान झाले. कणकवली विधानसभा मतदारसंघात आमदार नितेश राणे यांनी आपले उपसरपंच निवडीमध्ये देखील वर्चस्व राखले असून, 9 ठिकाणी भाजपचे उपसरपंच विराजमान झाल्याने इतरांच्या तुलनेत भाजपा नंबर 1 ठरली आहे.

दिगंबर वालावलकर, कणकवली

error: Content is protected !!