सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग या पतसंस्थेचे अध्यक्ष पदी श्री. संतोष परब व उपाध्यक्ष पदी श्री. संतान फर्नांडीस यांची निवड…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग या पतसंस्थेचे नुतन अध्यक्ष पदी श्री. संतोष परब ( क. सहा. ) व उपाध्यक्ष पदी श्री. संतान फर्नांडीस ( वाहनचालक ) यांची निवड नुकतीच करण्यात आली.
सदर निवड ही ओरोस येथील सिंधुदुर्ग जिल्हा कर्मचारी पतपेढी हॉल मध्ये करण्यात आली. यावेळी या पत्ता संस्थेचे संचालक
गीता वालावलकर, शमिका घडी, श्रीकृष्ण मुळीक, आनंद चव्हाण,न्हा नू दळवी, सूरज देसाई, निलेश मयेकर, विनोद राणे, बाणे, सचिव आंदुरलेकर, अमित तेंडुलकर, तात्या पवार उपस्थित होते. संतान फर्नांडिस हे मसुरे गावचे सुपुत्र असून त्यांचे मसुरे गावात कौतुक आणि अभिनंदन होत आहे..

मसुरे प्रतिनिधी

error: Content is protected !!