कणकवली तालुक्यातील पोलीस पाटीलांच्या 52 जागांकरिता 101 अर्ज

पोलीस पाटील पदा करीता 84 अर्ज ठरले पात्र
कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची माहिती
कणकवली तालुक्यातील रिक्त असलेल्या 52 गावांमधील पोलीस पाटील च्या रिक्त पदासाठी एकूण 101 अर्ज कणकवली तहसीलदार कार्यालयाकडे प्राप्त झाले. निकषानुसार व नियमानुसार यातील 84 अर्ज छाननीअंती पात्र ठरले असून, 11 गावांमधील पोलीस पाटील च्या रिक्त जागेसाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही अशी माहिती कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली. तीन गावांमध्ये प्रत्येकी 1 याप्रमाणे 3 अर्ज दाखल झाले होते. मात्र हे तीनही अर्ज अवैध ठरल्याने या जागा देखील रिक्त राहिल्या आहेत. पुढील प्रक्रिये अंती या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. कणकवली तालुक्यातील काही गावांच्या पोलीस पाटलांकडे अन्य गावांचा रिक्त पदाचा पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आल्याने अतिरिक्त कार्यभार असणाऱ्या पोलीस पाटलांकडे कामाचा ताण येत होता. मात्र लवकरच लेखी व तोंडी परीक्षांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पोलीस पाटील ची ही रिक्त पदे भरली जाणार असल्याने काही प्रमाणात हा ताण कमी होणार आहे. दरम्यान पात्र व अपात्र ठरलेल्या पोलीस पाटील पदा करिता च्या उमेदवारांची यादी कणकवली तहसीलदार कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
दिगंबर वालावलकर, कणकवली