कुडाळमध्ये शिवसेना ठाकरे गटाची बाळासाहेब ठाकरे याना आदरांजली

प्रतिनिधी । कुडाळ : येथील मध्यवर्ती शाखेत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देऊन आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजयजी पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुका प्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष अतुल बंगे, शहर प्रमुख संतोष शिरसाट, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक उदय मांजरेकर, माजी नगरसेवक सचिन काळप,माजी गटनेते बाळा वेंगुर्लेकर,पिंगुळी विभाग प्रमुख गुरू सडवेलकर, पावशी विभाग प्रमुख दीपक आंगणे,तेंडोली विभाग प्रमुख संदेश प्रभू,केरवडे उपशाखाप्रमुख सचिन ठाकूर, युवासेनेचे अमित राणे, स्वप्निल शिंदे,आंबडपाल उपसरपंच गोट्या चव्हाण,घावनळे उपविभाग प्रमुख पप्पु म्हाडेश्ववर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.