शिवसेना शिंदेगट यांच्या तर्फे बाळासाहेब ठाकरे याना कुडाळमध्ये अभिवादन

प्रतिनिधी । कुडाळ : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना आज कुडाळ तालुका शिवसेना (शिंदे गट) यांच्या तर्फे अभिवादन करण्यात आले.
त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी आज शुक्रवार दि १७ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कुडाळ येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. .या कार्यक्रमासाठी कुडाळ तालुक्यातील सर्व पदाधिकारी,शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख श्रीम.वर्षा कुडाळकर ,यांनी बाळासाहेब ठाकरेसाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. तसेच त्यांच्या कर्तृत्वाबद्दल सर्वांना माहिती देऊन मार्गदर्शन केले. यावेळी उप तालुका प्रमुख अरविंद करलकर, महिला तालुका प्रमुख सिद्धी शिरसाट, अनघा रांगणेकर, आराध्या करलकर, आशू अग्रवाल,रसिका पाटकर,जयदीप तुळसकर, पुंडलिक जोशी,सूरज करलकर, तसेच शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.





