शाळा ह्या विद्यार्थ्यातील सुप्त गुणांचा विकास करणारी संस्कार केंद्रे व्हाव्यात : डॉ.जी.टी.राणे

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेत कला प्रदर्शनाचे आयोजन
प्रतिनिधी । कुडाळ : शाळां या विद्यार्थ्यांतील सुप्त गुणांचा विकास करणारी संस्कार केंद्रे बनली पाहिजेत. याचे योग्य भान ठेवून शैक्षणिक कार्य करणारी शिक्षण संस्था म्हणजे बॅ.नाथ पै शिक्षण संस्था होय. असे उद्गार कुडाळ येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जी.टी राणे यांनी काढले. ते बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये दिवाळीनिमित्त आयोजित विविध वस्तूंच्या कलाप्रदर्शनाचे व खाद्यपदार्थांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये दिवाळीनिमित्त आयोजित विविध वस्तूंच्या कलाप्रदर्शनाचे व खाद्यपदार्थांच्या प्रदर्शनाचे आयोजन कार्नाय्त आले होते. या प्रदर्शनाचे उदघाटन डॉ. जी. टी. राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी. चेअरमन उमेश गाळवणकर, संस्थेच्या सीईओ अमृता गाळवणकर, सीबीएसई सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या शुभांगी लोकरे, उपप्राचार्य विभा वझे, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या कल्पना भंडारी,व विविध अभ्यासक्रमाचे प्राचार्य, प्राध्यापक, मार्गदर्शक शिक्षक इत्यादी उपस्थित होते.
डॉ. जी. टी. राणे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बरोबरच त्यांच्यातील कलागुणांचा विकास व्हावा म्हणून बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. . त्यातूनच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. ही कौतुकाची बाब आहे. संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक वृंद विविध असे स्तुत्य उपक्रम राबवतात; त्यातलाच हा एक कलाप्रदर्शनाचा उपक्रम नक्कीच अभिनंदनीय आहे. .डॉ.जी.टी.राणे यांनी विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी कला प्रदर्शनामध्ये मांडलेल्या सुंदर, सुबक व वैविध्यपूर्ण अशा कलाकृतींचे निरीक्षण करत आनंद घेतला.
आकाश कंदील, मेणबत्ती, विविध प्रकारच्या पणत्या याच्याबरोबरच विविध प्रकारचे, विविध भागात बनवले जाणारे रुचकर चविष्ट पदार्थ सुद्धा प्रदर्शनात मांडण्यात आले होते. . या सर्वांचा आस्वाद घेत खाद्य संस्कृती जोपासणाऱ्या विद्यार्थी- पालक यांच्या कौशल्यांचे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे सर्वानीच कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.