शिवसेना शिंदे गटाच्या वतीने बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन

तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांनी पुष्पहार अर्पण करत केले अभिवादन
कणकवली तालुका शिवसेना शिंदे गटा च्या वतीने आज कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस यावेळी तालुकाप्रमुख भूषण परुळेकर व ज्येष्ठ कार्यकर्ते भास्कर राणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
कणकवली /प्रतिनिधी





