बॅ.नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त संविता आश्रमला दिल्या भेटवस्तू

कला प्रदर्शनातील वस्तू विक्रीतून मिळालेल्या रकमेतून दिल्या भेटवस्तू
प्रतिनिधी । कुडाळ : येथील बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या कला प्रदर्शनातील वस्तूंच्या विक्रीतून मिळालेली रक्कम व त्यातून घेतलेले पदार्थ, वस्तू कुडाळ येथील आणावं येथील संविता आश्रमातील अनाथांना भेट म्हणून देऊन त्यांच्यासोबत आनंदाची दिवाळी आनंदाने साजरी केली.
कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये विविध अभ्यासक्रमांच्या वतीने दरवर्षी दिवाळी साठी आवश्यक असलेल्या पणत्या, मेणबत्या ,आकाश कंदील, विविध कलात्मक कलाकृती, खाद्यपदार्थ यांचे वैशिष्ट्यपूर्ण व वैविध्यपूर्ण वस्तूंचे एक कलाप्रदर्शन भरविले जाते. जणूकाही एक दिवाळीच्या वस्तू,पदार्थ, खाद्यपदार्थ महोत्सव भरविला जातो. त्यामध्ये सर्व अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसहित शिक्षक ,पालक, संस्थाचालक सहभागी होत असतात. व कला प्रदर्शनात मांडलेल्या वस्तूंचा आस्वाद घेत ,खरेदी करत आनंद लुटत असतात. यावर्षीही अशाच प्रकारचे कला प्रदर्शन भरवले गेले होते. त्यामध्ये नर्सिंग महाविद्यालयाच्या जी .एन. एम प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ व वस्तूंचा एक स्टॉल लावलेला होता . त्या स्टॉल वरील वस्तूंच्या विक्रीतून आलेली रक्कम व विविध दैनंदिन वापरातील उपयोगी वस्तू खरेदी करून त्यानी आणाव येथील संविता आश्रम मधील अनाथांना भेट देऊन त्यांच्या समावेत आनंदाची दिवाळी साजरी केली.
या मध्ये सेजल दिलीप खोपडकर, सानिया गुंडू जाधव, निकिता चंद्रशेखर कुडाळकर, अस्मिता मोहन ताम्हणकर, संजय लाडोजी सारंग, राखी अनिल नवाळे, स्मृती महाबळेश्वर वेरेकर, वैष्णवी विलास वारंग, विशाखा विलास परब, अक्षय दत्तप्रसाद साळगावकर.हे विद्यार्थी सहभागी झाले होते.त्यांच्या या अभिनव अशा संवेदनशीलता जपणाऱ्या उपक्रमाबद्दल संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भंडारी, सहयोगी प्रा. वैशाली ओटवणेकर,प्रा.प्रथमेश हरमलकर व इतर मार्गदर्शक प्राध्यापकांनी त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.
या कला प्रदर्शनामध्ये प्रत्येक अभ्यासक्रमाचे प्राचार्य ,प्राध्यापक , शिक्षकांसहित कलाशिक्षक श्री प्रसाद कानडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.