दिपावली पाडवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी घेतली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीत भेट

राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराचा दिपावली पाडवा दर वर्षी बारामतीत साजरा होत असतो. दिपावली पाडव्याचे औचित्य साधून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांसह अनेक नागरिक शरद पवार यांची घेण्यासाठी, त्यांचे शुभाशीर्वाद घेण्यासाठी बारामतीला येतात. शरद पवार ही आलेल्या प्रत्येक व्यक्तीची भेट घेऊन आपुलकीने विचारपूस करतात. एखाद्या राजकीय पक्षातील कौटुंबिक जिव्हाळ्याचे हे एकमेवद्वितीय उदाहरण आहे.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे परब यांनीही दिपावली पाडव्याच्या निमित्ताने सहकुटुंब बारामतीला भेट देत जेष्ठ नेते शरद पवार व खासदार. सौ. सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतली. “दर वर्षी दिपावली पाडव्याला आम्ही बारामतीत येऊन आमच्या दैवताचे दर्शन घेतो, त्यांचे आशीर्वाद घेतो. यावर्षीही नेते पवार व सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. ही भेट येत्या काळात मला ऊर्जा देणारी आहे.” अशी भावना अर्चना घारे परब यांनी व्यक्त केली.
सावंतवाडी, प्रतिनिधि