धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत जानवलीत स्वच्छता मोहीम

श्री सदस्यांचा स्वच्छतेसाठी पुढाकार

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा,ता.अलिबाग, यांच्या सौजन्याने आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठान मार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. याचप्रमाणे महात्मा गांधी जयंती निमित्त रविवार दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी कणकवली तालुक्यातील श्री बैठक जानवली येथील श्री सदस्यांनी लघु पाटबंधारे कार्यालय येथे स्वच्छता अभियान राबवले. येथील ५२ श्री सदस्यांनी मिळून ३००० चौ. मी. परिसर पूर्णतः स्वच्छ करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.या अभियानातून एकूण १.५ टन कचरा संकलित करण्यात आला. या अभियानात श्री सदस्यांनी घेतलेल्या सक्रिय सहभागाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!