शिवशौर्य यात्रेचे नांदगावात उस्फुर्त स्वागत

शिवराज्याभिषेक ३५० वे वर्ष निमित्त काढण्यात आलीय यात्रा

कणकवली/प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष असून या निमित्ताने विश्व हिंदू परिषद – बजरंग दल कोकण प्रांत च्या वतीने शिवशौर्य यात्रेला काल दोडामार्ग पासून सुरुवात झाली असून असून आज रविवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी दुपारी ठिक 1 वा. नांदगाव तिठा येथे या शिवशौर्य यात्रेचे आगमन झाले ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले आहे. दर्शन घेण्यासाठी शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
यावेळी भारत माता की जय,जय जय जय भवानी जय जय जय शिवाजी आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी सर्व प्रथम नांदगाव सरपंच भाई मोरजकर व संपूर्ण नांदगाव वासियांतर्फे स्वागत करण्यात आले. असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, माजी सरपंच पंढरी वायंगणकर,ओटव सरपंच हेमंत परुळेकर,आयनल माजी सरपंच बापू फाटक,तोंडवली बावशी माजी उपसरपंच अशोक बोभाटे, व्यापारी संघटनेच्या वतीने पंढरी वायंगणकर, मारुती मोरये, सुभाष बिडये तर नांदगाव माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष रज्जाक बटवाले यांनी ही स्वागत केले आहे. तसेच महीलांनी औक्षण केले यात हर्षदा वाळके, आर्या वायंगणकर,वेदीका फोंडके, भाग्यश्री कोरगावकर, पूर्वा वायंगणकर, गौरी परब,कमलेश पाटील, श्रीकृष्ण वायंगणकर, श्रीराम मोरजकर, रघुनाथ लोके, महेश लोके, राजू तांबे,संजय पाटील,बाबा केसरकर, अनिकेत तर्फे, संतोष घाडी, हनुमंत वाळके,चंदू शिंदे,सुशिल इंदप, संतोष मिराशी
संतोष पोकळे, संतोष बिडये,पपी सापळे,भुपेश मोरजकर,केदार खोत,राजेश तांबे , गोविंद लोके,आदी दशक्रोशीतून ग्रामस्थ उपस्थित होते
सहभागी झाले होते.
यावेळी नांदगाव विभागातून उस्फुर्त पणे शिवभक्त सहभागी झाले होते.

error: Content is protected !!