कुडाळ येथे माई ह्युंदाईच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या बॉडीशॉपचे उद्घाटन

कुडाळ येथे माई ह्युंदाईच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या बॉडीशॉपचे उद्घाटन कमलाकर सावंत (माजी अध्यक्ष, सिंधुदुर्ग चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज) यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी निलेश तेंडुलकर (मानद सचिव, उद्यमनगर सहकारी संस्था मर्यादित, कुडाळ) यांची प्रमुख उपस्थिती होती.
ऑक्टोबर 2013 मध्ये कुडाळ येथे माई ह्युंदाईची शोरूम आणि वर्कशॉप सुरू झालं. सिंधुदुर्गवासीयांनी या कालावधीत माई ह्युंदाईला भरभरून प्रतिसाद दिला. सुरक्षित, आरामदायी ह्युंदाई कार्स आणि माई ह्युंदाईची उत्तम विक्री पश्चात सेवा यामुळे ग्राहकांचा ओघ सतत वाढत राहिला. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात नवीन हायवेमुळे वर्दळ वाढत आहे. शिवाय सिंधुदुर्गात पर्यटनाच्या सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत. यामुळे माई ह्युंदाईने कुडाळ व कणकवली येथे अत्याधुनिक व सुसज्ज वर्कशॉप्स पण उभी केली.
यापूर्वी अपघातग्रस्त वाहनांच्या दुरुस्तीसाठी कोल्हापूर किंवा गोवा येथे वाहनं न्यावी लागायची. यासाठी करावयाची यातायात व मनस्ताप फारच व्हायचा. ही गरज लक्षात घेऊन माई ह्युंदाईने कुडाळमध्ये ह्युंदाईच्या अपघातग्रस्त कार्स दुरुस्त करता याव्यात म्हणून नवीन बॉडीशॉप सुरू केलं आहे. येथे अपघातग्रस्त वाहनांच्या सर्व प्रकारच्या दुरुस्तीसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माई ह्युंदाईचे मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांनी केलं आहे.
यावेळी माई ह्युंदाईचे डायरेक्टर दिग्विजय राजेभोसले, जनरल मॅनेजर विशाल वडेर, असि. जनरल मॅनेजर (सर्व्हीस) महेश गेज्जी, डेप्युटी जन. मॅनेजर राहुल घोटगाळकर, विकास सावंत तसेच कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ल्यातील मान्यवर ग्राहक उपस्थित होते