प्रसिद्ध युवा भजनी बुवा विश्वास उर्फ राजू घाडी आणि प्रसिद्ध मृदंगमणी मसुरे गावची शान सुरेश घाडी यांचा मसुरेत हृदय सत्कार..

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे देऊळवाडा गावचे सुपुत्र, भजन रत्न, संगीत भजनाचे बादशहा सुप्रसिद्ध बुवा विश्वास घाडी यांनी शनिवारी २३ सप्टेंबर रोजी मसुरे बाजारपेठ येथे मेघश्याम पेडणेकर परिवाराच्या निवासास्थानी श्री गणराया चरणी भजन रुपी सेवा सादर केली. अतिशय सुंदर पद्धतीने सादर केलेल्या संगीत भजनाचा आस्वाद मसुरे ग्रामस्थांनी घेतला. भजनरूपी सेवेनंतर बुवा विश्वास घाडी यांनी आजवर राज्यात विविध भजन स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांकाची बक्षिसे प्राप्त करून या भूमीचे नाव उज्वल केले आहे. प्रसिद्ध मृदुंग मणी मसुरे गावचे रत्न आदरणीय सुरेश घाडी गावकर याचा शिव प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. संगीत क्षेत्रात त्यांनी मसुरे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव देश भर पोचवले आहे. त्याच्या या कार्याचा गौरव म्हणून आणि भरतेश्र्वर प्रासादिक भजन मंडळ देऊळवाडा या मंडळाचा पेडणेकर परिवाराच्या वतीने श्री शिव प्रतिमा, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन पेडणेकर परिवारा तर्फ हृदय सत्कार करण्यात आला.
मसुरे प्रतिनिधी