सटेलमेंटचे दरवाजे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यानी बंद केल्याने उपरकर आणि कंपूची चिडचिड-धोंडू चिंदरकर

आचरा : सटेलमेंटचे दरवाजे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यानी बंद केल्यानेच माजी आमदारउपरकर आणि त्यांच्या कंपूची चिडचिड*होत असल्याचा टोला भारतीय जनता पार्टी मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी लगावला आहे.
माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पालकमंत्र्यांवर केलेल्या आरोपांवर चिंदरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रत्यूत्तर दिले आहे.
ज्यांची आंदोलनेच सटेलमेंट चीच असतात त्यांनी कार्यतत्पर पालकमंत्र्यांवर बोलणे हे सूर्यावर शिंतोडे उडविण्यासारख असल्याचे म्हटले आहे. उपरकरणी या जिल्ह्यातील एक कामं सांगावं जे त्यांनी केले आहे.फक्त टीका करणे आणि सटेलमेंट झाली की गप्प बसणे एवढेच काम उफरकर आणि त्यांची खंपू आजपर्यंत करत आलीआहे.एकलेन पुर्ण झाली याच फार दुःख मनसे ला जास्त आहे कारण विना सटेलमेंतट सगळ चालू राहीले. अजून काही गोष्टी राहिल्या असतील पण चव्हाण साहेब अतिशय तळमळीने झोकून देऊन या जिल्ह्याच्या विकासासाठी वेळ देऊन चांगल काम करत आहेत याची जान सिंधुदुर्ग वासियांना पर्यायाने कोकणी जनतेला आहे तेव्हा उपरकरणी आपली आणि आपल्या पक्षाची काळजी घ्यावी आणि नेहमी उलटे पाढे वाचण्या पेक्ष थोडे सकारात्मक बोलण्याचे कामं करावे असे चिंदरकर यांनी खडे बोल सूनावलेत

अर्जुन बापर्डेकर, कोकण नाऊ, आचार

error: Content is protected !!