रोटरी क्लब कणकवली सेंट्रलतर्फे ४७ सायकलींचे वाटप.

कणकवली/मयूर ठाकूर
रोजी रोटरी क्लब कणकवली सेंट्रलच्या वतीने आज ४७ विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला रोटरी क्लब कणकवलीचे पदाधिकारी तसेच सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष सुप्रिया नलावडे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की,”सायकल ही केवळ प्रवासाचे साधन नसून शिक्षणाच्या वाटचालीला गती देणारी आणि जीवनाचा प्रवास अधिक सुकर करणारी साथी आहे. सायकलचा वापर करताना प्रत्येक विद्यार्थिनीने वाहतुकीचे नियम पाळून स्वतःची सुरक्षितता जपावी,” असे आवाहन त्यांनी केले.व्यासपीठावर डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी डॉ. विद्याधर तायशेटे, रोटेरियन राजश्री रावराणे आणि चार्टर प्रेसिडेंट रोटेरियन दीपकभाई बेलवलकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे इव्हेंट चेअरमन रोटेरियन महेंद्र मुरकर यांनी लाभार्थी विद्यार्थिनींना शुभेच्छा देऊन त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटेरियन नितीन बांदेकर यांनी केले, तर सेक्रेटरी डॉ. अमेय मराठे यांनी उपस्थितांचे आभार मानले.






