विठुनामाच्या जयघोषात आयडियल इंग्लिश स्कूल दुमदुमले

कणकवली:प्रतिनिधी

ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे मध्ये आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न झाला सकाळपासूनच विठुनामाच्या जयघोषात परिसर न्हाऊन गेला होता,वारकरी दिंडीने या कार्यक्रमाची सुरुवात झाली मान्यवरांच्या शुभ हस्ते विठ्ठल आणि रुक्मिणी तुळशी माळा अर्पण करून सर्वांनी विठ्ठल रुक्मिणीचे मनोभावे दर्शन घेतले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यानी आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले तर पुंडलिकाची माहिती सांगणारे कीर्तने सादर केली गेली त्याच प्रमाणे विठ्ठलाचे अभंग या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सादर केले.
संत ज्ञानेश्वर, संत गोरा कुंभार,जनाबाई, संत तुकाराम अशा विविध संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते तर छोटे चिमुकले विठ्ठल रखुमाई आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालणाऱ्या रखुमाई,छोटे वारकरी यांनी या कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्षडॉ. विध्याधर तायशेटे,कार्याध्यक्ष बुलंद पटेल सर संस्था सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर, खजिनदारसौ.शितल सावंत मॅडम,सल्लागार डी. पी. तानावडे सर स्कूलच्या मुख्याध्यापिका और.अर्चना देसाई मॅडम त्याचप्रमाणे श्री. चिकोडी सर PTA मेंबर सौ.आदिती पाटकर मॅडम,स्कूल चे कोऑर्डिनेटर निलेश घेवारी सर,सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख वैष्णवी मोरवेकर मॅडम तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्युनिअर कॉलेजचे इयत्ता बारावीचे विद्यार्थी तसेच प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री.हेमंत पाटकर यांनी केले

error: Content is protected !!