कणकवली नगराध्यक्षांच्या कारच्या धडकेमध्ये गाय गंभीर जखमी

कारचा बंपर व नगराध्यक्ष पाटी तुटून पडली जागेवर

कणकवली कनकनगर दरम्यान घडला अपघात

कणकवली शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा अधोरेखित

कणकवली नगरपंचायत च्या नगराध्यक्षांच्या कारची धडक कणकवली कनकनगर येथील रस्त्यावर आलेल्या एका गाईला बसून ही गाय गंभीर जखमी झाली. तर त्यामध्ये नगराध्यक्षांच्या कारची समोरील पाटी व कारचा बंपरही जागेवर तुटून पडला. या धडकेनंतर कारचालकाने कार नगरपंचायत जवळ लावली. या घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. उपलब्ध माहितीनुसार कणकवली नगराध्यक्षांकरिता असलेल्या कारमधून मुख्याधिकारी या शहरात राहत असलेल्या घरी गेल्या. त्यांना सोडून नगराध्यक्षांची कार पुन्हा नगरपंचायतच्या दिशेने येत असताना कनकनगर दरम्यान कारची काळोखात रस्त्यावर आलेल्या गायला जोरदार धडक बसली. या धडकेमध्ये गाय गंभीर जखमी झाली. मात्र धडकेनंतर कारचालकाने तेथे थांबून जखमी गाईवर उपचारासाठी मदत करायला पाहिजे होती असे तेथे जमलेल्या नागरिकांचे म्हणणे होते. दरम्यान या घटनेमुळे कणकवली शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून याबाबत आता दस्तूरखुद्द मुख्याधिकारी काय भूमिका घेणार त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!