डामरे येथे आयोजित रक्तदान शिबिरात २१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

कै.सावंत बाबा यांच्या ५ व्या स्मृतिदिनानिमित्त श्री स्वामी समर्थ मठ डामरे येथे सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान व स्वामी समर्थ मठ देवस्थान डामरे यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२६ जुलै २०२६ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.या रक्तदान शिबिरामध्ये एकूण २१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. पंचायत समिती सदस्य श्री.चंद्रहास उर्फ बबलू सावंत व डामरे सरपंच श्री किरण कानडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी त्यांच्यासोबत डामरे पोलीस पाटील श्री विश्वास सावंत, साईनाथ सावंत,डामरे तंटामुक्ती अध्यक्ष श्री दशरथ साटम, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान कणकवलीचे श्री अमोल भोगले, कार्यकारी सदस्य श्री विनायक पारधिये,पारकर गुरूजी, श्री कृष्णा राणे, श्री कुबडे इतर मान्यवर उपस्थित होते.
हे शिबीर यशस्वी होण्यासाठी श्री विनायक पारधिये, साईनाथ सावंत व इतर स्वामी भक्तांनी विशेष परिश्रम घेतले. डामरे गावातील या वर्षीतील हे तिसरे रक्तदान शिबीर असून भविष्यातही अश्या शिबिराचे आयोजन करण्यात येईल अस आयोजका कडून सांगण्यात आले.
या शिबीराचे रक्त संकलन करण्यासाठी नवजीवन ब्लड सेंटर कणकवली यांना आमंत्रित करण्यात आले होते. नवजीवन ब्लड सेंटर च्या डॉ.सुप्रिया पाटील, श्री दादा कोरडे व संपूर्ण टीम ने हे शिबीर अगदी यशस्वीपणे पार पाडले.






