कुडाळच्या मारुती मंदिरात हरिनामाची अविरत धारा !

यावर्षी भजन स्पर्धेत ६० मंडळे सहभागी

आज चित्ररथ दिंडी, उद्या काल्याने समारोप

विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला, या नामघोषात येथील मारुती मंदिर मध्ये गेले सात दिवस सुरू असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाने शहर परिसर भक्तीरसात धावून निघाला आहे. आज सायंकाळी सात वाजता जिल्ह्यातील नामवंत चित्ररथ दिंडी या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. रविवारी २६ जुलै रोजी काल्याने या सप्ताहाची सांगता होणार आहे.
कुडाळ बाजारपेठेतील श्री देव मारुती मंदिरात हरिनाम सप्ताह निमित्त श्री देव मारुती नगर ब्राह्मण देवस्थान कमिटीच्या वतीने 19 ते 25 जुलै या कालावधीत संगीत भजन स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आल आहे. आज सायंकाळी सात वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत चित्ररथ दिंडी सोहळ्याचा आयोजन करण्यात आल आहे. उद्या 26 जुलैला सकाळी नऊ वाजता काल्याने सप्ताहाची सांगता होणार आहे. 27 जुलै रोजी दुपारी एक वाजता महाप्रसाद आहे असं श्री देव मारुती नगर ब्राह्मण देवस्थान कमिटीच्या वतीने सांगण्यात आलं.
यावर्षी या सप्ताह च्या निमित्ताने 60 वारकरी भजनी संघ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सहभागी झाले होते. पुढच्या वर्षी रत्नागिरी सिंधुदुर्ग सह रायगड जिल्ह्यातून एकूण 75 वारकरी भजन संघ सहभागी करण्याचे नियोजन असल्याचं मंडळाच्या वतीने सांगण्यात आलं. दरम्यान रोज सुरू असलेल्या विविध रंगी वारकरी भजनांमुळे या सप्ताहाच्या कार्यक्रमात रंगत येत आहे.

error: Content is protected !!