वरवडे येथे प्रताप भोसलेंच्या वाढदिनी शालेय साहित्य वाटप

मराठा समाजाचे युवा नेते, प्रतिथयश उद्योजक प्रताप भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त वरवडे येथे सर्व प्राथमिक शाळांमध्ये शालेय साहित्य वाटप करण्यात आले. हा उपक्रम स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडेचे अध्यक्ष कान्हा मालंडकर यांच्या माध्यमातून पार पडला. यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस संतोष उर्फ पप्पू पुजारे, अर्चित कदम, सुभाष मालंडकर, आनंद घाडी, सोहेल खान, सिझर फर्नांडिस, काका कदम, मंदार मेस्त्री, धनंजय सावंत
लतिफ खान, अमोल घाडीगांवकर, सदा चव्हाण, शिवदास साधिये, रितेश बावकर, सलमान शेख, कुणाल प्रभुदेसाई, अभी देसाई, आयरिस फर्नांडिस आदी उपस्थित होते.






