कुडाळ मारुती मंदिर आयोजित विविध स्पर्धांचा निकाल जाहीर

आंतरराज्य चक्री वारकरी भजन स्पर्धेत कासार्डेचे ‘धारेश्वर’ प्रथम

जिल्हास्तरीय मध्ये ‘केपादेवी’ वेंगुर्ले तर संगीत मध्ये ‘रामकृष्ण’ पाट प्रथम

आषाढी एकादशीच्या निमित्ताने हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून येथील श्री देव मारुती नगर ब्राम्हण देवस्थान कमिटी, बाजारपेठ कुडाळ आयोजित विविध स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये आंतरराज्य दिंडी चक्री वारकरी भजन स्पर्धा गटात श्री धारेश्वर प्रासादिक भजन मंडळ, आयरेवाडी, कासार्डे, जिल्हास्तरीय वारकरी भजन स्पर्धा गटात श्री देवी केपादेवी वारकरी भजन मंडळ, वेंगुर्ला, संगीत भजन स्पर्धा गटात रामकृष्ण हरी भजन सेवा संघ पाट पंचक्रोशी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. दि. १९ ते २५ जुलै या कालावधीत बाजारपेठ येथील मारुती मंदिर येथे या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आज सायंकाळी मारुती मंदिर येथे होणार आहे.
विविध स्पर्धांचा निकाल पुढील प्रमाणे आहे.

आंतरराज्य दिंडी चक्री वारकरी भजन स्पर्धा निकाल –

1)प्रथम क्रमांक – श्री धारेश्वर प्रासादिक भजन मंडळ, आयरेवाडी, कासार्डे
2)द्वितीय क्रमांक – श्री रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, मोसम, राजापूर
3)तृतीय क्रमांक – श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, वाघेरी, कणकवली
4)चतुर्थ क्रमांक -श्री आवळेश्वर प्रासादिक भजन मंडळ, तांबळवाडी, कासार्डे
उत्कृष्ट गायक – श्री. विजय आईर (श्री धारेश्वर प्रासादिक भजन मंडळ, आयरेवाडी, कासार्डे)
उत्कृष्ट पखवाज -श्री. सागर मोहिते (श्री आवळेश्वर प्रासादिक भजन मंडळ, तांबळवाडी, कासार्डे)
उत्कृष्ट कोरस – श्री धारेश्वर प्रासादिक भजन मंडळ, आयरेवाडी, कासार्डे
उत्कृष्ट वेषभुषा – श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, वाघेरी.

जिल्हास्तरीय वारकरी भजन स्पर्धा निकाल

1)प्रथम क्रमांक – श्री देवी केपादेवी वारकरी भजन मंडळ, वेंगुर्ला
2)द्वितीय क्रमांक- श्री देव वेतोबा वारकरी भजन मंडळ, मायनेवाडी, कोचरा
3)तृतीय क्रमांक -श्री सिद्धिविनायक वारकरी भजन मंडळ, कोचरा
4)चतुर्थ क्रमांक -श्री विठ्ठल रखुमाई महिला वारकरी भजन मंडळ, वेंगुर्ला
उकृष्ट गायक – श्री प्रतिक गिरप (श्री देवी केपादेवी वारकरी भजन मंडळ, वेंगुर्ला)
उत्कृष्ट पखवाज -श्री देव वेतोबा प्रासादिक भजन मंडळ मायनेवाडी,कोचरा (श्री देव वेतोबा वारकरी भजन मंडळ, मायनेवाडी, कोचरा)
उत्कृष्ट कोरस – श्री देवी भावई वारकरी भजन मंडळ, कोचरा
उत्कृष्ट नृत्यअविष्कार -श्री विठ्ठल रखुमाई महिला वारकरी भजन मंडळ, वेंगुर्ला.

संगीत भजन स्पर्धा निकाल

प्रथम – रामकृष्ण हरी भजन सेवा संघ पाट पंचक्रोशी,
द्वितीय-श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी,
तृतिय-नवतरुण युवक प्रासादिक भजन मंडळ, माणगाव
चतुर्थ – श्री महापुरूष प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी,
पाचवा – विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी
उत्तेजनार्थ प्रथम- स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ, तांबोळी,
उत्तेजनार्थ द्वितीय-जैन महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळ, वालावल
उत्कृष्ट गायक – रूपेश यमकर (रवळनाथ प्रा.भ. पिंगुळी),
हार्मोनिअम – वैभव सावंत (सदगुरु संगीत भजन मंडळ कुडाळ),
तबलावादक वैभव सुतार (स्वामी समर्थ मंडळ तुळसुली), पखवाजवादक – यश सावंत (जैन महालक्ष्मी मंडळ वालावल),
झांजवादक – चिन्मय लाड (दत्तकृपा भजन वैभववाडी) व
कोरस – ब्राम्हणदेव भजन मंडळ उपरे (खारेपाटण)

error: Content is protected !!