सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत आयडियलचे यश

कणकवली/मयूर ठाकूर

दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च या परीक्षेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज कॉमर्स आणि सायन्स वरवडे या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे जिल्हास्तरावर घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत कु.शाश्वत शशिकांत तांबे (इयत्ता आठवी )याने 22 वी रँक,तर कु.नील प्रमोद पवार (इयत्ता आठवी) याने जिल्हास्तरावर या परीक्षेत 34 वी रँक मिळवली आहे,त्यांच्या या यशाबद्दल नुकताच प्रशालेत ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बुलंद पटेल सर, आयडियल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई मॅडम,स्कूलचे कॉर्डिनेटर निलेश घेवारी सर यांच्या उपस्थितीत मेडल आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री मोहन सावंत सर,कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल सर, सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर सर,खजिनदार सौ. शितल सावंत मॅडम,सल्लागार डी.पी तानावडे सर, मुख्याध्यापिका सौ. अर्चना देसाई मॅडम, आणि शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्गातून यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!