कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाजसेवा मंडळामार्फत होणार गुरुपौर्णिमा उत्सव

पूर्णानंद स्वामींच्या प्रतिमेला करण्यात येणार अभिषेक
कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाजसेवा मंडळ कणकवली च्या वतीने बुधवारी 29 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता फोंडाघाट येथील पूर्णानंद भवन या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्त पूर्णानंद स्वामींच्या प्रतिमेला अभिषेक करण्यात येणार आहे. यावेळी सर्व ज्ञाती बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन समाजसेवा मंडळाचे तालुकाध्यक्ष सुरेश सामंत यांनी केले आहे.






