रोटरी क्लब कणकवली च्या वतीने कणकवलीत विद्यार्थांना मोफत गणवेश व पौष्टिक आहाराचे वाटप

रोटरी क्लबचे सदस्य अनिल कर्पे यांच्यामार्फत आयोजन
रोटरी च्या अध्यक्ष सुप्रिया नलावडे यांनी मानले आभार
रोटरी क्लब कणकवली सेंट्रलच्या माध्यमातून रोटरीयन अनिल कर्पे यांच्या सहभागाने अंगणवाडी शाळा क्रमांक २ आणि बौद्धवाडी अंगणवाडी शाळा येथे मुलांना गणवेश आणि पौष्टिक आहार वाटप करण्यात आले. यावेळी रोटरीच्या अध्यक्षा सुप्रिया नलावडे, सेक्रेटरी डॉ. अमेय मराठे, खजिनदार डॉ. प्राजक्ता नाचणे, अनिल कर्पे, अंकिता कर्पे, संध्या पोरे, उमा परब, सोम गांगण, मेघा गांगण, रोट्रॅक्टर राज नलावडे, अंगणवाडी सेविका सुनेत्रा मेस्त्री, मदतनीस, पालक आणि मुले आदी उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी






